आमदार रोहित पवार यांनी कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या कार्याचे भर सभेत केले कौतुक उत्कृष्ट कामगिरीचा आदर्श, रोहित पवार यांचे अभिमत
- Police warrant
- Oct 25
- 1 min read

जामखेड प्रतिनधी २०सप्टेंबर२०२५
जामखेड पोलीस स्टेशनचे माजी कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या उत्कृष्ट सेवेला आमदार रोहित पवारांनी 19 सप्टेंबर रोजी झालेल्या भर सभेत महत्वाचे कौतुक केले. त्यांनी संभाजी गायकवाड यांच्या काळात जामखेड शहरात कायदा व सुव्यवस्था अत्यंत सुव्यवस्थित आणि प्रभावी पद्धतीने राखली गेली असल्याची आठवण करून दिली. खास करून रात्रभर फिरून त्वरित कारवाई करणे, शिस्तबद्ध पार्किंग व्यवस्था, आणि नागरिकांच्या तक्रारींवर तत्पर प्रतिसाद देणे अशा कारभारामुळे व्यवस्था अबाधित राखण्यात आली होती. रोहित पवार यांनी पोलीस प्रशासनाला अशाच प्रकारे कर्तव्यदक्षपणे काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले.
व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
👇👇👇👇👇👇👇
सभेत नागरिकांनी जामखेड व खर्डा पोलीस स्टेशनच्या कायदा सुव्यवस्थेबाबत अनेक तक्रारी मांडल्या, पण संभाजी गायकवाड साहेबांच्या कार्यकाळातील कामगारपणाची आठवण देत त्यांच्यासारखे अधिकारी व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.











Comments