top of page
website.jpg

इन्स्टाग्राम रिल्स स्टार कोमल काळे बसमधील पर्स चोरणारी सराईत गुन्हेगार; बंटी-बबली जोडी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद कोमल काळेवर ३ गुन्हे, प्रियकरवर ८ केसेस

ree

आहिल्यानगर प्रतिनिधी/3 डिसेंबर2025

अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बसमधील महिलांच्या पर्समधून सोने व रोख रक्कम चोरी करणारी सराईत गुन्हेगार 'रिल्स स्टार' कोमल नागनाथ काळे (१९, रा. भिमसेननगर, शेवगांव) व तिचा प्रियकर सुजित राजेंद्र चौधरी (२५, रा. शंकरनगर, शेवगांव) यांची जोडी पकडली. पाथर्डी नवीन बस स्टँडजवळ सापळा रचून कोमलला ताब्यात घेतल्यानंतर चौधरीला शेवगांव येष्ठ घरी छापा मारून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून १,७०,००० रुपयांचा आयफोन १७ प्रो मॅक्स, १५,००० रुपयांचा ओप्पो मोबाईल, ७,४८,००० रुपयांचे ६.५ तोळे सोन्याचे दागिने व २,२३० रुपये रोख असा एकूण ९,३५,२३० रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला.


दिनांक १९ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता पाथर्डी-कल्याण एसटी बसमधून अलका मुकुंद पालवे (३९, रा. देवराई, पाथर्डी) यांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरली (पाथर्डी गु.र.१२७५/२०२५, भा.न्या.सं.३०३(२)). चौकशीत कोमलने मुद्देमाल चौधरीकडे दिल्याची कबुली दिली, तर चौधरीने चोरीच्या पैशाने मोबाईल व सोने विकत घेतल्याचे सांगितले.


आणखी दोन गुन्ह्यांची कबुली: १८ ऑक्टोबर अमरापूर-शेवगांव बस चोरी (शेवगांव गु.र.९०८/२०२५, भा.न्या.सं.३०३(२)) व २० नोव्हेंबर पाथर्डी-भगूर बस चोरी (शेवगांव गु.र.९५९/२०२५, भा.न्या.सं.३०३(२)).

सराईत गुन्हेगारांची पार्श्वभूमी:

कोमलवर यापूर्वी बीड व अहिल्यानगरमध्ये ३ गुन्हे: शिरूर कासार (बीड) गु.र.१७८/२०२२ (भा.द.वि.३६३,३२४,३२३,५०४,५०६,३४), गेवराई (बीड) गु.र.५२९/२०२२ (म.पो.अ.१२४), सुपा (अहिल्यानगर) गु.र.६७/२०२४ (भा.द.वि.३७९). चौधरीवर ८ गुन्हे: सोनई (१९१/२०२२: भा.द.वि.३९५,३९२,३६३,३४१,४१२; १६३/२०२२:३९५,३४१; १८४/२०२२:३९२,२०१,३४), पाथर्डी (९०/२०२२:३९२,२०१,३४; ८८/२०२३:४५४,४५७,३८०), तोफखाना (३९३/२०२४:म.पो.का.१२९,१३१(क)), एमआयडीसी (३२१/२०२५:भा.न्या.सं.३१६(२),३१७(२)), चकलंबा (बीड) ८४/२०२२ (३९२,३४). दोघेही दरोडा, जबरीचोरी व घरफोडीचे मास्टरमाइंड.

पोलिस.अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक. किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही यशस्वी कारवाई केली. पथकात सपोनि. हरिष भोये, पो.अंमलदार सुरेश माळी, विष्णु भागवत, फुरकान शेख, दीपक घाटकर, भिमराज खर्से, बाळासाहेब खेडकर, किशोर शिरसाठ, विशाल तनपुरे, प्रकाश मांडगे, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब गुंजाळ, प्रशांत राठोड, भगवान थोरात, जालिंदर माने, महिला पो.अंमलदार वंदना मोडवे, भाग्यश्री भिटे, सारिका दरेकर, ज्योती शिंदे, सोनाली भागवत व चालक भगवान धुळे सामील.

आरोपी कोमलचे इन्स्टा आयडी 'komal_kale_1__' वर ५०,०००+ फॉलोवर्स; ती रिल्सद्वारे भोळ्या महिलांना फसवते. नागरिकांना अनोळखींवर विश्वास ठेवू नये, मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या असे आवाहन.

 
 
 

Comments


0 (D19).jpg

प्रत्येक क्षणाचं अपडेट

साप्ताहिक ‘पोलीस वारंट न्यूज नेटवर्क’च्या

नव्या वेबसाईटचे सोमवार दि १० नोव्हेंबरला लोकार्पण

आदरणीय. सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले
यावेळी सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांनी

संपादिका श्वेता गायकवाड यांना नवीन उपक्रमासाठी

मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.  
या कार्यक्रमास भाजपा पदाधिकारी,

कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,

वातावरण उत्साहाने दुमदुमले!

Website Designed, Developed and hosted by DIGITALFLY

Centent Provided by

POLICE WARRANT © 2025 All Rights Reserved

bottom of page

This text cannot be easily copied.

This text is also protected by the 'inert' attribute.