ई-पेपर
- Police warrant
- Dec 8
- 1 min read

नृत्यांगना दीपाली पाटील आत्महत्याप्रकरणातील आरोपी माजी नगरसेवक संदीप गायकवाड याच्या पक्षीय ओळखीवरून जामखेडचे राजकारण पेटले आहे. भाजप आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) दोन्ही पक्षांकडून फोटो, व्हिडिओ आणि जुने प्रचारपुरावे समोर ठेवत एकमेकांवर तीव्र आरोप–प्रत्यारोप सुरू आहेत.२०१६ मध्ये गायकवाड यांनी जामखेड नगरपरिषदेत राष्ट्रवादीकडून विजय मिळवला, २०१९ मध्ये ते रोहित पवारांसोबत सक्रिय दिसले आणि २०२४ मध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचा उल्लेख केला जातो. दुसरीकडे, नुकत्या निवडणुकीत रोहित पवारांनी उमेदवारी नाकारल्याने त्यांच्या पत्नीने भाजपकडून बंडखोरी केली, मात्र गायकवाड यांचा अधिकृत पक्ष प्रवेश नाही, असा भाजपचा युक्तिवाद आहे.राष्ट्रवादीने भाजप रॅलीतील गायकवाडचे व्हिडिओ आणि राम शिंदे यांच्यासोबतचे फोटो दाखवून “वापरून फेका” राजकारणाचा आरोप केला, तर भाजप नेते शरद कार्ले यांनी हे सर्व रोहित पवारांच्या पराभवानंतरचे बदनामीचे षडयंत्र असल्याचे म्हटले आणि निष्पक्ष चौकशीची मागणी केली. सुरू असलेल्या पोलिस तपासात सीसीटीव्ही व इतर पुरावे तपासले जात असताना, गायकवाड नेमका कोणत्या पक्षाचा हा प्रश्न अनुत्तरितच राहिल्याने जामखेडमध्ये तिखट चर्चा रंगल्या आहेत.











Comments