उजनी धरणाच्या कॅनॉलमध्ये सापडला अनोळखी युवकाचा मृतदेह – ओळख पटवण्यासाठी टेंभुर्णी पोलिसांकडून मदतीचे आवाहन
- Police warrant
- Oct 31
- 1 min read

अहिल्यानगर प्रतिनिधी/३१ऑक्टोबर२०२५
टेंभुर्णी पोलीस ठाणे हद्दीतील मौजे रांजणी परिसरामध्ये उजनी धरणाच्या मुख्य कॅनॉलच्या पात्राजवळील रेस्ट हाऊसच्या परिसरात दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना दिली.
मृत व्यक्तीचे सविस्तर वर्णन:
अंदाजे वय: २५ ते ३० वर्षेत्वचेचा रंग: गोरापोशाख: काळा फुल बाहीचा शर्ट व काळ्या रंगाची जीन्स पॅन्टछातीवर "येडेश्वरी" असे गोंदवलेले टॅटूउजव्या हातावर "साईराम" असे टॅटूनाक: सरळदाढी: काळ्या रंगाची, राखलेली केस काळ्या रंगाचे
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आहे. या व्यक्तीचे नाव, ओळख किंवा मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी पोलिसांची चौकशी सुरू आहे, तसेच परिसरातील वेगवेगळी माहिती घेतली जात आहे. पोलिसांनी मृत व्यक्तीच्या ओळखीबाबत मदतीचे आवाहन केले आहे.
कोणत्याही नागरिकास अथवा स्थानिकांना या व्यक्तीची ओळख पटत असल्यास ताबडतोब पुढील पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा:नारायण पवार, पोलीस निरीक्षक – 9763523849अजित मोरे, पोलीस उपनिरीक्षक – 8275265394ही माहिती समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवावी. अशा घटनांमध्ये सहकार्य करणे ही जबाबदारी आणि कर्तव्य आहे.











Comments