कर्जत-जामखेडपासून चिंचवडपर्यंत लाखो दुबार मतदारांचा घोळ; रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल
- Police warrant
- Nov 5
- 1 min read

जामखेड प्रतिनिधी/5 नोव्हेंबर2025
राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत मतदार यादीत दुबार नावे असल्याची कबुली दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे सरचिटणीस आणि आमदार रोहित पवार यांनी आयोगावर तीव्र हल्लाबोल केला आहे.पवार यांनी मागणी केली की आयोगाने तातडीने दुबार मतदारांची नावे आणि संख्या सार्वजनिक करावी. त्यांनी आरोप केला की मतदार याद्यांतील चुका दुरुस्त न करता केवळ सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली निवडणुका जाहीर करण्यात आल्या."मतदार यादीत एकाच व्यक्तीचे नाव दोन, तीन, अगदी चार वेळा आढळत आहे. लाखो दुबार मतदार राज्यभर आहेत. सर्वच राजकीय पक्षांसह आयोगानेही ही बाब मान्य केली आहे, तरी योग्य दुरुस्ती न करता निवडणुका जाहीर केल्या गेल्या," असे पवार म्हणाले.रोहित पवार यांच्या मते, लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर केवळ सहा महिन्यांत राज्यात तब्बल ४८ लाख नव्या मतदारांची भर पडली. म्हणजेच दर महिन्याला ८ लाख नवीन मतदार नोंदवले गेले — आणि हीच सत्ताधाऱ्यांच्या ‘घोळाची’ सुरुवात असल्याचे त्यांनी म्हटले.कर्जत-जामखेड मतदारसंघात १४ हजार दुबार मतदारांचे पुरावे त्यांच्या कडे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यात सर्वच जाती-धर्मांचे मतदार आहेत. शिरुर मतदारसंघात १,१३३ दुबार मतदार व १,५७८ मिसिंग नोटीस असल्याचे तर चिंचवड मतदारसंघात तब्बल ५४,६६० संशयास्पद नावे आढळल्याचा दावा पवार यांनी केला.











Comments