कर्जत-जामखेडमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का; दत्तात्रय वारे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
- Police warrant
- Nov 13
- 2 min read

जामखेड प्रतिनिधी/13 नोव्हेंबर2025
कर्जत-जामखेड तालुक्यात शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय वारे यांनी बुधवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. त्यांच्या सोबत कर्जत-जामखेड परिसरातील शरद पवार गटाचे अनेक पदाधिकारी, सरपंच, माजी सरपंच, बाजार समिती संचालक आणि शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपा प्रवेशद्वार ओलांडले.भाजपाचा पक्षप्रवेश सोहळा मुंबईतील प्रदेश कार्यालयात पार पडला. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले.

कार्यक्रमाला विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, आमदार मनोज घोरपडे, ज्येष्ठ नेते सुनील कर्जतकर, अंबादास पिसाळ, अनील गजाबे, प्रवीण घुले, काकासाहेब तापकीर, राजेंद्र गोंडस, संतोष मेहेत्रे आणि माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते.यावेळी रविंद्र चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश आणि राज्य विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचले आहे. देशाला बलशाली बनवण्यासाठी सशक्त भाजपा गरजेची असून, नव्याने पक्षात दाखल झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचा विश्वास अबाधित ठेवण्याचं आश्वासन त्यांनी दिलं.सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले की, समाजकारणाचा मोठा अनुभव असलेले अनेक कार्यकर्ते आज भाजपात दाखल झाले आहेत. त्यामुळे पक्ष संघटन अधिक बळकट होईल आणि कार्यकर्त्यांसह क्षेत्रातील प्रलंबित विकासकामांना गती मिळेल.आमदार मनोज घोरपडे यांनी सांगितले की, विकासाच्या राजकारणाने प्रेरित होऊन राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे कार्यकर्ते भाजपात आले आहेत. पाल-इंदोली उपसा सिंचन योजनेसह अनेक प्रलंबित प्रश्न केवळ फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच सोडवू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.दत्तात्रय वारे म्हणाले की, भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. इथे साधा कार्यकर्ता देशाचा पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री होऊ शकतो. आहिल्यानगर जिल्ह्यातून भाजपा प्रवेश करणाऱ्यांमध्ये माजी सहाय्यक आयुक्त राजेंद्र पवार, नगरसेवक प्रसाद ढोकरीकर, माजी सरपंच सखाराम भोरे, माजी उपसभापती दादासाहेब रिटे, सरपंच सीताराम कांबळे आणि सुंदरदास बिरंगळ यांचा समावेश आहे.तसेच कराड उत्तर तालुक्यातून यशवंतराव चव्हाण पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष सतीश शिंदे, ज्येष्ठ नेते सुभाष गोरे, नरेंद्र साळुंखे, माजी सरपंच जनार्दन साळुंखे, आदर्श शेतकरी प्रवीण साळुंखे, उद्योजक प्रशांत जाधव, तानाजी पाटील आणि जालिंदर लामजे यांनी भाजपात प्रवेश केला.











Comments