खांडवी खून प्रकरणातील मुख्य आरोपी २४ तासांत पकडला; श्रीगोंदा परिसरात सापळा रचून गुन्हे शाखेची धडक कारवाई
- Police warrant
- Nov 16
- 2 min read

आहिल्यानगर प्रतिनिधी/16 नोव्हेंबर2025
खांडवी (ता. कर्जत) येथील खून प्रकरणात मुख्य आरोपी अवघ्या 24 तासांत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतल्याची ठळक माहिती समोर आली आहे . या घटनेमुळे संपूर्ण भागात खळबळ उडाली असून, पोलिसांनी केलेली कारवाई कौतुकास्पद मानली जात आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शुभम प्रल्हाद साळवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे वडील प्रल्हाद सोनाजी साळवे (रा. चिंचोली रमजान, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) हे 12 नोव्हेंबर 2025 रोजी कामावर गेल्यानंतर दोन दिवस घरी आले नव्हते. 14 नोव्हेंबर रोजी त्यांचा मृतदेह खांडवी शिवारातील इरिगेशनच्या पत्र्याच्या खोलीमध्ये आढळून आला. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.या खुनात आरोपी जमली उर्फ संध्या गोरख भोसले व धन्या उर्फ धनंजय रजाकार काळे (दोघेही रा. चिंचोली रमजान) यांनी आर्थिक कारणावरून मयताचा खून केल्याची माहिती मिळाली. आरोपीनी मयताकडे पैशाची मागणी केली, पण नकार मिळाल्यामुळे दोघांनी रागाच्या भरात प्रल्हाद साळवे यांचा खून केला. या प्रकरणाचा तपास मिरजगांव पोलीस ठाणे गु.र.नं. 246/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1), 3(5) अन्वये सुरू आहे.
सदर गुन्हा घडल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी घटनाठिकाणी भेट देवुन घटनाठिकाणची पाहणी करुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/समीर अभंग, पोलीस अंमलदार रमेश गांगर्डे, गणेश लबडे, ऱ्हदय घोडके, लक्ष्मण खोकले, फुरकान शेख, भिमराज खर्से, शाम जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब गुंजाळ, प्रकाश मांडगे, अमोल आजबे, मनोज साखरे, प्रशांत राठोड, महादेव भांड यांचे पथक तयार करुन सदर पथकास गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन रवाना केले.
पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे श्रीगोंदा परिसरात सापळा लावला. पथकाने आरोपी धन्या काळे यास ताब्यात घेतले आणि चौकशीत गुन्ह्याची कबुली मिळवली. पोलिसांनी सांगितले की, आरोपी काही दिवस कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य करत होता, परंतु कौशल्यपूर्वक पाठलाग करून त्यास पकडण्यात आले आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि अंमलदार यांनी संघटित कार्य, वेगवान संशोधन, व बारकाईने गुन्ह्याचा तपास करून मुख्य आरोपीला पकडले.
या घटनेमुळे परिसरात चिंता निर्माण झाली असली, तरी पोलिसांच्या त्वरित पाठलागामुळे स्थानिक जनता आणि विविध सामाजिक संघटनांनी कौतुक व्यक्त केले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास मिरजगांव पोलीस करीत आहेत.











Comments