जामखेड नगरपरिषद अध्यक्षपदाच्या उमेदवारीवर सस्पेन्स संपला; राष्ट्रवादीकडून संध्या शहाजी राळेभात, भाजपकडून प्रांजल अमित चिंतामणी यांच्या नावावर शिक्कामोर्तब
- Police warrant
- Nov 18
- 1 min read

जामखेड – नगरपरिषद निवडणुकीसाठी नगर अध्यक्षपदाच्या उमेदवारीवर अखेरची मोहोर उमठली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद पवार गटाकडून शहाजी राळेभात यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून प्रांजल अमित चिंतामणी यांचा नावावर खात्री मिळाली आहे तसेच पायल आकाश बाफना शिवसेना शिंदे गट ,रहीमुन्नीसा कमाल शेख आम आदमी पार्टी, सुवर्णा महेश निमोनकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ,परवीन शिरोजीद्दीन शेख समाजवादी पार्टी, प्रा.कैलास विलास माने अपक्ष,प्रति विकास राळेभात अपक्ष
.निवडणूक कार्यालयात अर्ज दाखल करण्याची प्रक्रियेदरम्यान उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी मोठी उपस्थिती दर्शविली. अर्ज छाननीसाठी प्रशासन सज्ज असून आजपासून छाननी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर अध्यक्षपदासाठी मुख्य लढत ही राष्ट्रवादीचे शहाजी राळेभात विरुद्ध भाजपच्या प्रज्ञा चिंतामणी यांच्यात होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.नगरपरिषदेसाठी अर्ज दाखल करणे, छाननी आणि अंतिम उमेदवार यादी जाहीर करण्याची प्रक्रिया निर्धारित वेळेत पूर्ण होणार आहे. ३ डिसेंबर रोजी जामखेड नगरपरिषदेसाठी मतदान होईल.
शहरात निवडणूकीचे वातावरण आता खऱ्या अर्थाने तापले असून दोन्ही पक्षांच्या प्रचार मोहिमांना वेग आला आहे.नगरपरिषदेच्या अध्यक्षपदासाठी प्रमुख पक्षांनी अधिकृत उमेदवार जाहीर केल्याने स्थानिक राजकारणात रंगत आणि स्पर्धा वाढली आहे. शहराच्या विकासासाठी सक्षम नेतृत्व निवडले जाईल, अशी अपेक्षा मतदार व्यक्त करत आहेत











Comments