जामखेड नगरपरिषद निवडणूक 2025 : उमेदवार मुलाखती आणि रणनीतीसाठी सभापती प्रा. राम शिंदे यांचे दिशा-निर्देश जनतेच्या मनातील कार्यकर्त्यालाच तिकीट, विरोधकांमध्ये शांतता तर भाजपात उत्साहाची लाट
- Police warrant
- Nov 10
- 2 min read

जामखेड नगरपरिषद निवडणूक 2025 संदर्भातील प्रभाग ३, ४, ११, १२ या प्रभागांसाठी आयोजित बैठक आणि उमेदवार निवड प्रक्रिया अत्यंत उत्साहात पार पडली.
जामखेड नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ३, ४, ११, १२ मधील इच्छुक उमेदवारांची मुलाखत आज दि १० डिसेंबर रोजी जगदंबा हॉल, खर्डा रोड,

जामखेड येथे संपन्न झाली.या बैठकीत भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आणि महिला भगिनींचा मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदला गेला. उमेदवारांची नावे, निवड प्रक्रिया, आणि जनतेमधील चर्चा यामुळे वातावरण उत्साही राहिले.
सभापती प्रा. राम शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितले की,
विरोधकांच्या गोटात शांतता असून, भाजपा कार्यकर्त्यांचा उत्साह उल्लेखनीय आहे."मी कुठेही जाणार नाही, तुमच्यातच राहणार; गुजरात कार्यक्रमात स्पेशल विमानाने गेलो, पण लगेच परत आलो," असे सांगत त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांचा विश्वास वाढवला."मी निवडणुकीनंतर कोणाचाही फोन टाळत नाही, विरोधकांचेदेखील घेतो. आपला तो आपलाच असतो.""आपल्या वॉर्ड मध्ये आपला भाजपाचा उमेदवार निवडणून आणायचे आहेत. कामाचा आत्मविश्वास ठेवा. दृष्ट लागू नये म्हणून काळा टिपका लावा," अशीही गंमतीदार आणि कार्यप्रेरक टिप्पणी यावेळी दिली

.
प्रा. राम शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले की, गेल्यावेळची चूक या वेळी होणार नाही; इच्छुक उमेदवार निश्चित करताना, जो लोकांमध्ये आहे, लोकांच्या मनात आहे, जो लोकांचे काम करत आहे, त्यालाच तिकीट मिळेल.कोणताही उमेदवार दिल्यास, त्याला सर्व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे सहकार्य मिळायला हवे, कुणीही नाराज न होता पक्ष एकसंघपणे काम करेल."माझ्या चुकांमधून धडा घेत सर्व काही बारकाईने लक्ष देऊन पाहणार," असे ते म्हणाले.
निवडणुकीत भाजपा ताकदीनिशी उतरली असून, प्रभाग बैठकीत उमेदवार निश्चिती, कार्यप्रणाली, आणि कार्यकर्त्यांची दिशा ठरवली जात आहे.जामखेड राजकारणामध्ये ही निवडणूक भाजप आणि विरोधकांमध्ये मोठ्या संघर्षाचे केंद्रबिंदू राहणार आहे. सत्ता परिवर्तन किंवा टिकाव यावर राज्यभर चर्चा आहे.मतदारांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने या बैठकीत सहभाग घेतला; सर्व सहभागी उमेदवार, समर्थक, आणि कार्यकर्त्यांसाठी बैठक प्रेरणादायी ठरली आहे
.यामुळे, जामखेड नगरपरिषद निवडणूक 2025 मध्ये पुढील काही दिवस अत्यंत निर्णायक व रंगतदार ठरणार आहेत.











Comments