जामखेड नगरपरिषदेत तब्बल ७५.६३ टक्के मतदान; २५,०८१ मतदारांनी बजावला लोकशाही हक्क
- Police warrant
- Dec 2
- 1 min read

जामखेड प्रतिनिधी/२ डिसेंबर२०२५
अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल ७५.६३ टक्के मतदान नोंदवले आहे. उपलब्ध अधिकृत आकडेवारीनुसार, नगरपरिषद क्षेत्रातील एकूण ३३,१६१ मतदारांपैकी २५,०८१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, यामध्ये १२,८५९ पुरुष आणि १२,२२२ महिला मतदारांचा समावेश आहे.
मतदान सकाळी ७.३० ते सायं. ५.३० या वेळेत शांततेत पार पडले असून, मोठी अनुचित घटना घडल्याची नोंद नाही. निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि नियोजनबद्ध पार पडल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. आता २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जामखेड नगरपरिषद निवडणुकीत प्रभागानुसार झालेले मतदान :












Comments