जामखेड नगरपरिषदेत ७.३० ते ३.३० दरम्यान ५८.७९ टक्के मतदान; १९,४९७ मतदारांनी बजावला लोकशाही हक्क
- Police warrant
- Dec 2
- 1 min read

जामखेड प्रतिनिधी/२डिसेंम्बर २०२५
अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी उत्साहाने सहभाग नोंदवत एकूण सकाळी ७.३० ते दुपारी ३.३० दरम्यान ५८.७९ टक्के मतदान झाले आहे. अधिकृत आकडेवारीनुसार जामखेड नगरपरिषद क्षेत्रातील एकूण ३३,१६१ मतदारांपैकी १९,४९७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, त्यात ९,६७४ पुरुष आणि ९,८२३ महिला मतदारांचा समावेश आहे. मतदान सकाळी ७.३० वाजता सुरु होऊन दुपारी ३.३० वाजेपर्यंत शांततेत पार पडले. कोणतीही मोठी अनुचित घटना घडल्याची नोंद नसून, निवडणूक प्रक्रिया सुरळीत झाल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. अधिकृत निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर होणार असल्याने जामखेडकरांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.











Comments