top of page
website.jpg

जामखेडमध्ये नाफेड हमीभाव खरेदी केंद्राचा शुभारंभ; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

ree

जामखेड प्रतिनिधी :12डिसेंबर2025

कृषी उत्पन्न बाजार समिती जामखेड व महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नाफेड हमीभाव खरेदी केंद्राचा शुभारंभ शुक्रवारी (दि.१२ डिसेंबर २०२५) सकाळी ११ वाजता करण्यात आला. सोयाबीनसाठी जाहीर केलेल्या ₹५,३२८ प्रतिक्विंटल हमीभावामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यावेळी बोलताना सभापती पैलवान शरद कार्ले म्हणाले की,जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना हमीभावाची खात्रीशीर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बाजार समिती व नाफेडचे अधिकारी प्रयत्नशील आहेत. शेतकऱ्यांनी अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन कार्ले यांनी केले.

या प्रसंगी ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, दत्तात्रय वारे,माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर, बाजार समितीचे सभापती पैलवान शरद कार्ले, उपसभापती नंदकुमार गोरे, सचिव वाहेद सय्यद, संचालक नारायण जायभाय, सुधीर राळेभात,रविंद्र हुलगुंडे, डॉ.सिताराम ससाणे, विठ्ठल चव्हाण,सतिष शिंदे,सुरेश पवार, तसेच प्रविण चोरडिया, भाजप शहरमंडल अध्यक्ष संजय काशिद, पोपट राळेभात, अंकुश ढवळे, गोरख घनवट,नगरसेवक अमित चिंतामणी, दिगंबर चव्हाण, डॉ ज्ञानेश्वर झेंडे,पवन राळेभात, युवा नेते बाजीराव गोपाळघरे, ॲड. प्रविण सानप, पिंटूशेठ बोरा, शिवाजी डोंगरे, दादा अंदूरे, प्रविण होळकर, डॉ. विठ्ठल राळेभात, उध्दव हुलगुंडे, सुनील यादव आदी मान्यवर, व्यापारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेतकरी पुत्र सभापती पै.शरद कार्ले, उपसभापती नंदकुमार गोरे तसेच संचालक मंडळ यांचे धोरण नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी असून विविध सामाजिक उपक्रम राबवत आहेत.


ऑनलाईन नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे:

आधार कार्ड व ७/१२ उताऱ्यातील ई-पिक माहिती नोंदलेली असणे,आधारशी लिंक मोबाईल नंबर,शेतकऱ्याच्या नावाचे बँक खाते/पासबुक,नोंदणीसाठी शेतकरी स्वतः हजर फिंगरप्रिंट(थम्)किंवा ओटीपी द्यावा लागेल.न दिल्यास नोंदणी होणार नाही.फार्मर आयडी लिंक आधार कार्ड व मोबाईल नंबर.

शासनाने ठरवलेल्या निकषांनुसार एफ.ए.क्यू. दर्जाचे सोयाबीनच खरेदी केंद्रावर स्विकारले जाणार आहे.ठिकाण - कृषी उत्पन्न बाजार समिती, कार्यालय पाठीमागे (गोडावून) सेल हाॅल


 
 
 

Comments


0 (D19).jpg

प्रत्येक क्षणाचं अपडेट

साप्ताहिक ‘पोलीस वारंट न्यूज नेटवर्क’च्या

नव्या वेबसाईटचे सोमवार दि १० नोव्हेंबरला लोकार्पण

आदरणीय. सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले
यावेळी सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांनी

संपादिका श्वेता गायकवाड यांना नवीन उपक्रमासाठी

मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.  
या कार्यक्रमास भाजपा पदाधिकारी,

कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,

वातावरण उत्साहाने दुमदुमले!

Website Designed, Developed and hosted by DIGITALFLY

Centent Provided by

POLICE WARRANT © 2025 All Rights Reserved

bottom of page

This text cannot be easily copied.

This text is also protected by the 'inert' attribute.