जि. प. प्रा शाळा खर्डा उर्दू येथे ईद-ए-मिलादुन्नबी कार्यक्रमात विद्यार्थ्यांना भेटवस्तू, नवीन कक्षा आणि पॅनल मंजुरीचे सरपंचांचे आश्वासन; समाजातील मान्यवरांचा उत्साही सहभाग
- Police warrant
- Oct 25
- 1 min read

खर्डा प्रतिनिधी/१३ऑक्टोबर२०२५
खर्डा येथील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळेत दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ रोजी ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त भव्य जशन सोहळा संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन धार्मिक आणि सामाजिक ऐक्याचा संदेश दिला.
खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत , कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य वैजीनाथ पाटील, गावच्या सरपंच सौ. संजीवनीताई पाटील, आझाद फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शहाबाज सय्यद, भाजपा अध्यक्ष बाळासाहेब गोपाळघरे, सामाजिक कार्यकर्ते टिल्लूभाई पंजाबी, कार्यकर्ते भास्कर गोपालघरे, तसेच पोलीस कॉन्स्टेबल पंडित हंबर्डे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
शाळेत आयोजित विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. विद्यार्थ्यांनी मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावर हिंदी, इंग्रजी आणि मराठी भाषेत प्रभावी भाषणे केली.
आझाद फाउंडेशनचे अध्यक्ष शहाबाज सय्यद यांनी शाळेसाठी २७ बेंचेस भेट दिल्या, त्यांचा शाळेच्या वतीने API उज्वलसिंह राजपूत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.पांडुरंग शिवाजी भोसले यांनी शाळेसाठी ४ व्हाइट बोर्ड्स दिले, त्यांचा सत्कार वैजीनाथ पाटील यांच्या हस्ते झाला.रेहान भाई बागवान यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना पाण्याच्या बाटल्या, वह्या व पेन वाटप करण्यात आले.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हिना भाभी कुरेशी यांच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्या व बेल वाटप करण्यात आले.
यावेळी सरपंच संजीवनीताई पाटील आणि वैजीनाथ पाटील यांनी शाळेसाठी दोन नवीन वर्गखोली आणि इंटरअॅक्टिव्ह पॅनल बोर्ड लवकरात लवकर मंजूर करून देण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाची प्रस्तावना समीना सय्यद मॅडम यांनी केली, सूत्रसंचालन मोमीन सर यांनी केले, आभार प्रदर्शन शेख सर यांनी मानले. काझी सर कार्यक्रमाला उपस्थित होते. गावातील ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांचे पालक उत्साहाने सहभागी झाले.











Comments