डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जामखेडमध्ये 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सिद्धार्थ नगर आणि तहसील कार्यालयावर भव्य अभिवादन
- Police warrant
- Dec 6
- 1 min read

जामखेड/प्रतिनिधी —6 डिसेंबर2025
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणींसाठी व आदरांजलीसाठी 6 डिसेंबर 2019 रोजी सिद्धार्थ नगर तसेच तालुक्याचे प्रमुख शासकीय कार्यालय असलेल्या तहसील कार्यालय येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तहसिलदार व पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या तैलचित्रावर पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.समस्त भिमसैनिक जामखेड तालुका संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयात डॉ. आंबेडकरांचे तैलचित्र बसवले आहे आणि दरवर्षी येथे येऊन अभिवादन करणे हे भिमसैनिकांचे आद्य कर्तव्य असल्याचे सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले यांनी सांगितले.या वेळी बौद्धाचार्य अशोक आव्हाड यांनी सामुदायिक बुध्दवंदना घेतली. तसेच जेष्ठ नेते मधुकर राळेभात, अॅड. अरुण जाधव, माजी नगरसेवक अमित चिंतामणी, विकास बाफना, प्रा. लक्ष्मण ढेपे, अमोल लोहकरे, अॅड. प्रविण सानप, अमित जाधव, डॉ. कैलास हजारे, शिवकुमार डोंगरे, डिगंबर राळेभात, अमोल मोरे व पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनीही अभिवादनपर उपस्थिती दर्शवली.तसेच सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले, भिमटोला ग्रुपचे अध्यक्ष बापुसाहेब गायकवाड, माजी संचालक सागर सदाफुले, दादासाहेब घायतडक, सचिन सदाफुले, अॅड. कृष्णा शिरोळे, किशोर काबंळे, प्रमोद सदाफुले, नितीन सदाफुले, शेखर घायतडक, विनोद घायतडक, सुर्यकांत सदाफुले, बाबा सोनवणे, अमोल पो. सदाफुले, विशाल गव्हाळे, सनी प्रिन्स सदाफुले आणि प्रिन्स ग्रुप तसेच सिद्धार्थ नगर मित्र मंडळाचे सर्व भिमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक न्याय, समता व शिक्षणाच्या महत्वाच्या भूमिकेचा आदरपूर्वक सन्मान करण्यात आला. जामखेडमध्ये विविध समुदायातील लोकांनी एकत्र येऊन त्यांच्या विचारांचा प्रसार करण्याचा संकल्प व्यक्त केला.











Comments