दिघोळ गणातुन सौ.दीपाली गर्जे पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात उतरणार
- Police warrant
- Nov 16
- 1 min read
Updated: Nov 19

जामखेड प्रतिनीधी/16 नोव्हेंबर
दिघोळ गणातील आगामी पंचायत समिती निवडणुकीचे वातावरण तापू लागले असून सौ.दिपाली गर्जे पक्षनिष्ठा, जनसेवा आणि कार्यक्षम नेतृत्वाचा प्रभावी ठसा उमटवणाऱ्या दिपाली गर्जे नावाभोवती समर्थकांची मोठी एकजूट झाली आहे.दिपाली गर्जे गेली पंधरा वर्षे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असताना दिपाली ताईंनी राजकीय शिस्त, प्रामाणिक काम आणि लोकांशी संवाद या गुणांनी स्वतःची भक्कम ओळख निर्माण केली आहे.
जातेगावच्या माजी सरपंच आणि सध्याच्या ग्रामपंचायत सदस्य या भूमिकेतून त्यांनी गावोगाव मजबूत जनसंपर्क जपला आहे.
महिलांच्या मनाचा ठाव घेतलेल्या दिपाली गर्जे महिला बचत गटांच्या उभारणीपासून ते विविध शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीपर्यंत महिलांच्या समस्यांना प्राधान्य देत सातत्याने काम केले आहे.नवरात्र उत्सवातील सहभाग, सामाजिक उपक्रमांतील पुढाकार, गावातील डोलच्या कामांपासून ते तातडीच्या मदतीपर्यंत त्यांचे कार्य सर्वत्र गौरवले जाते.
यामुळेच दिपाली गर्जे महिला वर्गामध्ये विश्वासाचे मजबूत पाठिंबा आहे.आता त्या जामखेड तालुक्यातील दिघोळ गणातून पंचायत समितीच्या रिंगणात उरणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
“पक्षाने तिकीट दिल्यास जनतेचा विश्वास जिंकणार”सौ.—दिपाली गर्जे
“पक्षाने माझ्यावर विश्वास ठेऊन संधी दिल्यास, त्या विश्वासाचे सोने करून दाखवणार. जनतेच्या अपेक्षांना न्याय देणे हेच माझे उद्दिष्ट आहे.”त्यांच्या निर्धाराने आणि जमलेल्या जनसमर्थनाने निवडणुकीत त्यांची दमदार उपस्थिती अधिक स्पष्ट झाली आहे.यामुळे दिघोळ गणात निवडणूक अधिकच चुरशीची होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.











Comments