नगर कोतवाली पोलीस स्टेशनला संभाजी गायकवाड यांची धडक एन्ट्री
- Police warrant
- Oct 25
- 1 min read

अहिल्यानगर, २४ सप्टेंबर –
अहिल्यानगर शहरातील प्रमुख मानल्या जाणाऱ्या कोतवाली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी संभाजी गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
कोतवाली ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यावर काही दिवसांपूर्वी अत्याचाराचा गुन्हा नोंद झाल्यानंतर त्यांची बदली नियंत्रण कक्षात केली होती. त्यामुळे रिक्त झालेल्या पदावर कोणाची नियुक्ती होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.
व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
👇👇👇👇👇👇👇
पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी याआधी जामखेड तसेच पारनेर पोलीस स्टेशनची जबाबदारी सांभाळली आहे. पारनेरवरून त्यांची तबादली नाशिकला झाल्यानंतर काही दिवसांपूर्वीच ते पुन्हा अहिल्यानगर जिल्ह्यात आले होते व नियंत्रण कक्षात कार्यरत होते. आता त्यांच्याकडे कोतवाली पोलीस ठाण्याची सूत्रे देण्यात आली आहेत.
या नियुक्तीनंतर जामखेडसह तालुक्यातील नागरिकांकडून व कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
"नगर कोतवाली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी आता सिंघम गायकवाड – संभाजी गायकवाड यांनी सूत्रे स्वीकारली आहेत.जामखेड आणि पारनेरमध्ये केलेल्या प्रभावी कार्यामुळे ओळख निर्माण केलेले गायकवाड यांची जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी नियुक्ती केली आहे.
माजी निरीक्षक प्रताप दराडे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते.गायकवाड यांना कार्यकाळात गुन्हेग्रस्तांवर कारवाई, स्थानिक गुन्हेगारी आळा व कायद्यास सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान असणार आहे.नगर कोतवालीत कर्तव्यदक्ष संभाजी गायकवाडांची एन्ट्री - स्थानिकांत समाधान आणि अभिनंदन!"











Comments