जामखेड नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवारांची घोषणा लवकरच; निवडणूक रणनिती पत्रकार परिषदेत दृढ – सभापती प्रा. राम शिंदे
- Police warrant
- Nov 12
- 1 min read

जामखेड प्रतिनिधी/१२नोव्हेंबर२०२५
भाजपाकडून जामखेड नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत 145 इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत. भाजपाचा नगरसेवक आणि 24 नगरसेवक पदांसाठी उमेदवार भाजपचेच असणार असून मित्रपक्षाशी चर्चा सुरू आहे. या मोठ्या प्रमाणावर सहभागामुळे जामखेड नगरपरिषदेवर भाजपाचा झेंडा आणि नगराध्यक्षपद भाजपाकडे ठेवण्याचा इरादा आहे.महाराष्ट्र राज्य विधानसभा सभापती प्रा. राम शिंदे यांनी काल दि 11 नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषदेत सांगितले की येत्या 2-3 दिवसांत नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांचा चेहरा जाहीर केला जाईल.
भाजपाच्या वतीने ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून निवडणूक रणनितीची तयारी आणि इच्छुक उमेदवारांची तीव्र स्पर्धा अधोरेखित झाली.या नव्या उमेदवारांमध्ये स्थानिक नेतृत्वाला अधिक सामावून घेऊन भाजपाकडून जामखेडमध्ये सत्ताधारी पक्ष म्हणून स्थान मजबुत करण्याचा मानस जाणवतो. मित्रपक्षांसह चर्चा व समीकरणांवर लक्ष ठेवून योग्य उमेदवार निवडण्याचे काम सुरु असल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जामखेड नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचा दबदबा वाढेल असा अंदाज वर्तविला जात आहे.
.











Comments