नृत्यांगना दीपाली पाटील मृत्यूप्रकरणी सभापती प्रा. राम शिंदे यांचा रोहित पवारांवर जोरदार पलटवार: 'दिशाभूल करू नये !
- Police warrant
- Dec 12
- 2 min read

जामखेड, १२ डिसेंबर २०२५:
जामखेडमधील नृत्यांगना दीपाली पाटील यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणाने राजकीय वाद उफाळून आला आहे. आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणात प्रशासनावर आणि स्थानिक नेत्यांवर टीका केल्यानंतर
सभापती प्रा. राम शिंदे यांनी शब्दशः पलटवार केला आहे. कल्याण येथील मूळ रहिवासी असलेल्या दीपाली पाटील यांचा साई लॉजमध्ये गळफास घेऊन झालेला मृत्यू संशयास्पद असल्याचे सांगत, पोलिस सखोल चौकशी करत असल्याची माहिती शिंदे यांनी दिली
दीपाली पाटील या कल्याण येथील मूळ रहिवासी होत्या, ज्या काही कारणास्तव जामखेडला स्थलांतरित झाल्या.त्यांचा साई लॉजमध्ये गळफास घेऊन संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी सखोल तपास सुरू केला असून, मुख्य संशयित आरोपी संदीप गायकवाड याला अटक करण्यात आली आहे. या घटनेने स्थानिक पातळीवर खळबळ उडाली असून, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेते यांनी न्यायाची मागणी केली आहे.
रोहित पवारांच्या वक्तव्याला राम शिंदेंचा प्रत्युत्तर;
आमदार रोहित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट) यांनी या प्रकरणात उपस्थित केलेल्या प्रश्नावर सभापती राम शिंदे यांनी राष्ट्रवादी श.प.गटावर टीका केली. शिंदे म्हणाले, "या संदर्भामध्ये आमदार रोहित पवार यांनी जे वक्तव्य केले, ते चुकीचे आहे. मुख्य संशयित संदीप गायकवाड यांचा राजकीय इतिहास रोहित पवारांना चांगलाच माहीत आहे.
पलटवार करत शिंदे म्हणाले २०१६ मध्ये संदीप गायकवाड हे आणि त्यांची पत्नी लता गायकवाड घड्याळ चिन्हावरून (राष्ट्रवादी) निवडून आले होते. २०१९ पर्यंत ते रोहित पवारांसाठी काम करत होते. २०२४ साली संदीप गायकवाड हे शरद पवारांच्या उपस्थितीत अजित पवार गटातून तुतारी पक्षात (राष्ट्रवादी श.प.गट) सामील झाले, असे राम शिंदे यांनी सांगितले.
सभापती राम शिंदे यांनी पुढे सांगितले, "संदीप गायकवाड हे राष्ट्रवादी काँग्रेस श.प.गटाचेच आहेत. त्यांनी कधीही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला नाही. भाजपने नगरपालिका निवडणुकीत केवळ लता संदीप गायकवाड यांना उमेदवारी दिलेली होती. तरीही आजपर्यंत श.प.गटाने संदीप गायकवाड यांना पक्षातून काढलेले नाही. अशी दिशाभूल करू नये!" या वक्तव्याने रोहित पवारांच्या आरोपांना धक्का बसला आहे.राजकीय चर्चांना उधाणया प्रकरणाने जामखेडमध्ये राजकीय वातावरण तापले आहे.
राष्ट्रवादी श.प.गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. स्थानिक नागरिकांनी पोलिस तपासाला वेग देण्याची मागणी केली असून, दीपाली पाटील यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशी अपेक्षा आहे. सभापती शिंदे यांनी पोलिसांना प्रकरणाचा छानखेद करण्याचे निर्देश दिले आहेत.











Comments