नृत्यांगना महिलेची गळफास घेत आत्महत्या ; जामखेड मधील साई लॉजवरील घटना
- Police warrant
- Dec 4
- 2 min read

जामखेड प्रतिनिधी/4 डिसेंम्बर 2025
जामखेड शहरातील तपनेश्वर भागातील नृत्यांगना दिपाली गोकुळ पाटील (वय 35) या महिलेनं गुरुवारी सकाळी खर्डा रोडवरील हॉटेल "साई लॉज" च्या रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. दिपाली ही मूळ कल्याण जिल्ह्यातील असून सध्या जामखेडमधील एका कलाकेंद्रात नृत्यांगना म्हणून काम करत होती. ती आपल्या काही इतर मैत्रिणी सोबत तपनेश्वर भागातील भाड्याच्या रुममध्ये राहत होती.घटनास्थळी मिळालेल्या माहितीप्रमाणे, दिपालीने सकाळी आपल्याला बाजारात जाऊन येण्यासाठी सांगितले आणि बाहेर पडली. मात्र दुपारी बराच वेळ झाल्यानंतर तिने परत येणे टाळले. तिच्या मैत्रिणींनी त्यांच्याशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण दिपालीचा फोन बंद होत असल्याने संपर्क साधता आला नाही. त्यामुळे मैत्रिणींनी दिपालीने ज्या रिक्शाने प्रवास केला होता, त्या रिक्शावाल्याला विचारले असता त्याने सांगितले की, त्याने दिपालीला खर्डा रोडवरील "साई लॉज" या हॉटेलात सोडले आहे.
मैत्रिणी साढे पाच वाजता त्या हॉटेलमधील लॉजकडे गेल्या असता, त्यांच्या लक्षात आले की रुमच्या आतून लॉक केलेले आहे. त्यांनी वेटरची मदत घेऊन दुसऱ्या चाव्याने रुमचा दरवाजा उघडला असता, दिपाली गोकुळ पाटील छताच्या पंख्याला गळफास घेऊन मृत अवस्थेत आढळली.घटनेनंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. जामखेड पोलीस स्टेशनकडून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलीसांनी त्वरित घटनास्थळी भेट देऊन शवविच्छेदनासाठी मृतदेह जामखेड ग्रामीण रुग्णालयात हलविला आहे. पोलीसांनी पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु केला आहे
दिपाली ही नृत्यांगना असून तिच्या आत्महत्येचा नेमक कारण अद्याप समजलेले नाही. तिच्या मैत्रिणी हर्षदा रविंद्र कामठे यांच्या तक्रारीनुसार पोलीसांनी प्रकरणाची नोंद घेतली आहे.
कोट
सध्या जामखेडमधील नागरिकांमध्ये मृत्यू हत्या की आत्महत्या या संदर्भात प्रश्न व चर्चा सुरू आहे.स्थानिक लोकांचं मत आहे की, जामखेड परिसरात गुन्हेगारी व अवैध लॉजिंग वाढत असल्यामुळे अशा अमानुष घटना घडू शकतात, त्यामुळे या प्रकारच्या हॉटेल व लॉजवर पोलिसांनी तत्काळ कारवाई करावी. तसेच अशा परिस्थितीत झालेल्या मृत्यूची सखोल चौकशी करून योग्य निष्कर्ष काढायला हवा.हे प्रकरण स्थानिक प्रशासन आणि पोलीस यांच्यासमोरील मोठं आव्हान ठरले आहे.











Comments