पक्षनिष्ठा आणि कार्यतत्परतेची दखल; जामखेड शहर भाजप युवा मोर्चा अध्यक्षपदी संतोष गव्हाळे यांची निवड – पक्षातील युवा नेतृत्वाला नवी दिशा सभापती.प्रा. राम शिंदे यांनी दिल्या शुभेच्छा
- Police warrant
- Oct 28
- 1 min read

जामखेड (प्रतिनिधी) – 28 ऑक्टोबर2025
भारतीय जनता पार्टी जामखेड शहर मंडल कार्यकारिणीमध्ये सामाजिक कार्यकर्ते संतोष गव्हाळे यांची युवा मोर्चा अध्यक्षपदी निवड झाली असून या निवडीचे जामखेड तालुका आणि शहरातील भाजप कार्यकर्त्यांत स्वागत करण्यात आले आहे. महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी या निवडीबद्दल गव्हाळे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे की, संतोष गव्हाळे यांची पक्षनिष्ठा, जनतेशी असलेली सातत्यपूर्ण बांधिलकी, प्रामाणिक कार्यशैली आणि संघटन कौशल्य याची ही पावती आहे. पक्षनेतृत्वाने दाखवलेला विश्वास हा केवळ त्यांच्या वैयक्तिक कार्यगौरवाचा नाही, तर सर्व कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.त्यांनी पुढे म्हटले की, गव्हाळे यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चाचे संघटन अधिक बळकट होईल. कार्यकर्त्यांत नवचैतन्य निर्माण होईल आणि पक्षविचार जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचतील.
युवा पिढीला संघटनात्मक कार्यामध्ये सहभागासाठी प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी त्यांच्या उज्ज्वल, यशस्वी आणि समाजहितासाठी समर्पित कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.या निवडीबद्दल शहर व तालुक्यातील पक्षपातळीवर संतोष गव्हाळे यांची निवड करण्यात आली असून संतोष गव्हाळे यांना विविध विभागातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून अभिनंदन संदेशांचा वर्षाव होत आहे. त्यांनी युवा मोर्चा कार्यकत्यांच्या माध्यमातून समाजातील तरुण पिढीला संघटित करणे, पक्षविचार प्रसार करणे आणि जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज उठविणे हे ध्येय ठेवले असल्याचे सांगितले.शहरातील युवा कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि घोषणाबाजी करून या निवडीचा आनंद साजरा केला. गव्हाळे यांच्या निवडीमुळे जामखेड शहरात भारतीय जनता पार्टीच्या कार्याला नवे दिशा आणि गतिमानता मिळेल, असा विश्वास स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.











Comments