पवार कुटुंब: डान्स आणि राजकारण एकत्रित तालावर; 2024 ला मी शिकार झालो - सभापती प्रा.राम शिंदे
- Police warrant
- Dec 7
- 1 min read

जामखेड प्रतिनधी/७ डिसेंबर२०२५
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांच्या विवाहाच्या प्रसंगी अजित पवार आणि आमदार रोहित पवार यांचा एकत्रित डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर सभापती प्रा. राम शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, "मला वाटतं त्या एकत्रित नृत्याचा मी 2024 ला शिकार झालेलो आहे आणि आता त्या परिस्थितीवर मार्ग कसा काढायचा याचा प्रयत्न करीत आहे."सभापती राम शिंदे म्हणाले की, पवार कुटुंबियांचा राजकीय नृत्य आणि लग्नातील नृत्य हे समान स्वरूपात आहेत, दोन्ही एकत्रित असतात आणि ते कधीही विभक्त नृत्य करत नाहीत. त्यांनी स्पष्ट केले की, लग्नातील एकत्रित नृत्य ही फार मोठी गोष्ट नाही कारण राजकीय क्षेत्रात देखील ते एकत्र नृत्य करत असतात आणि तो एक प्रकारचा परफॉर्मन्सच आहे.सभापती राम शिंदे यांनी असेही म्हणाले की, "हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे की, पवार कुटुंबीय राजकीय स्तरावरही एकत्रित काम करत असून माझा 2024 चा अनुभव हा एकत्रित नृत्याचा शिकार होण्याचा अनुभव होता.
" त्यामुळे, लग्नामध्ये एकत्र नृत्य करणं काही नवं नाही, तर ते राजकारणातील त्यांची एकजूट दर्शविते. या वक्तव्यांमुळे राजकीय विश्वात पुन्हा पवार कुटुंबीयांच्या एकत्रितपणावर चर्चा रंगली आहे.











Comments