पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे — आहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या मनातील "सिंघम" सतत कारवाया, शिस्तबद्ध कामगिरी: कायदा सुव्यवस्थेची नवी मिसाल; संतोष खाडे यांच्या कारवायांचे अनुकरणीय उदाहरण
- Police warrant
- Oct 25
- 2 min read

श्वेता गायकवाड
परिविक्षाधीन पोलीस उपधीक्षक संतोष खाड़े यांनी आहिल्यानगर जिल्ह्यात केलेल्या दंबग कामगीरीचा साप्ताहिक पोलीस वारंटने घेतलेला हा खास रिपोर्ट आपल्याकरिता प्रकाशित करत आहोत......
न्युज पेपरवरील लेख वाचन्याकरिता खालील लिंक वरती क्लिक करा
👇👇👇👇👇
आहिल्यानगर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा असून, येथे कर्जत, जामखेड, अकोले, कोपरगाव, नगर, नेवासा, पारनेर, पाथर्डी, राहाता, राहुरी, शेवगाव, श्रीगोंदा, श्रीरामपूर व संगमनेर अशा १४ तालुक्यांचा समावेश होतो. या जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण हे तुलनेत जास्त असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिस प्रशासनाला सातत्याने सजग राहावे लागते.
जिल्ह्यात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि अवैध धंद्यांवर निर्बंध आणण्यासाठी आहिल्यानगरचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गी यांनी एक विशेष पोलीस पथक स्थापन केले असून, याचे नेतृत्व परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.
पोलीस उपाधीक्षक खाडे यांच्या नेतृत्वाखालील या पथकाने जिल्ह्यात अवघ्या काही महिन्यांत जोरदार धडक कारवाया केल्या असून, गुटखा, मावा, जुगार अड्डे, अवैध देशी-विदेशी दारू, वाळू तस्करी आणि परवाना नसलेली हॉटेल्स यांसारख्या अवैध व्यवसायांवर धाडसी कारवाई करून कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या कारवायांमुळे संतोष खाडे यांचे नाव गुन्हेगारी विश्वात धसक्याचे बनले आहे. आज जिल्ह्यात संतोष खाडे यांच्या नावानेच गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. अनेकांनी स्वतःहून आपले अवैध व्यवसाय थांबवले आहेत, हेच त्यांच्या कार्यशैलीचे मोठे यश मानले जात आहे.
संतोष खाडे यांनी दारू व्यवसायांवर कडक कारवाई करून अनेक कुटुंबांना उद्ध्वस्त होण्यापासून वाचवले आहे. महिलांचे, ज्येष्ठ नागरिकांचे आणि युवकांचे आयुष्य या व्यसनांमुळे उध्वस्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, त्यांच्या कारवाया समाजहितासाठी आश्वासक ठरल्या आहेत. त्यामुळे संतोष खाडे यांना "आहिल्यानगरचे सिंघम" अशी उपाधी सामान्य नागरिकांनी बहाल केली आहे.
जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये करण्यात आलेल्या काही महत्त्वपूर्ण कारवायांची झलक पुढीलप्रमाणे:
कर्जत-जामखेड: गुटखा तस्करी प्रकरणी ४ लाखांचा मुद्देमाल जप्त
नेवासा-पारनेर: देशी दारू अड्ड्यांवर एकाच वेळी ५ ठिकाणी छापे
शेवगाव-श्रीरामपूर: जुगार अड्ड्यावर धाड; १० आरोपींना अटक
संगमनेर-राहुरी: वाळू तस्करांकडून ८ ट्रॅक्टर जप्त
नगर शहर व कोपरगाव: अवैध हॉटेल्सवर कारवाई, परवाना नसलेल्या ठिकाणी सील मारले
दिल्ली गेट परिसरात मावा कारखान्यावर छापा
अकोले-1 कोटींचा गुटखा जप्त; 13 आरोपी अटक
समृद्धी महामार्गावरून गुटखा वाहतूक करणारा आयशर ट्रक पकडला-७७लाखांचा मुद्देमाल जप्त
पाथर्डी-गुटखा कारखान्यावर छापा लाखोंचा मुद्देमाल जप्त;२आरोपी अटक
कोपरगाव-६४ लाखांचा गुटखा जप्त
नगर MIDC हद्दीतील के.के.रेंज परिसरात वाळू वाहतूकीवर छापा
या सर्व कारवायांमुळे पोलिस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी एक कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि निर्भीड अधिकारी म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्वसामान्य नागरिकांनी त्यांचे कौतुक करून आभार व्यक्त करत पोलीस वारंट न्यूज नेट्ववर्कच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.











Comments