प्रवीण बोलभट यांची जामखेड तालुका युवासेना प्रमुखपदी निवड, कार्यकर्त्यांत उत्साह
- Police warrant
- Nov 7
- 1 min read

जामखेड प्रतिनिधी/7 नोव्हेंबर2025
शिवसेना (शिंदे गट)च्या जामखेड तालुका युवासेना प्रमुखपदी प्रवीण बोलभट यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड गुरुवारी शिवसेना दक्षिण जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले यांच्या हस्ते जाहीर करण्यात आली.जामखेड नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तयारीसाठी पक्षाची संघटनात्मक मोर्चेबांधणी सुरू असून, त्याच पार्श्वभूमीवर बोलभट यांच्या नियुक्तीला स्थानिक कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.या कार्यक्रमास शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष वाळुंजकर, बब्रुवान वाळुंजकर, दादासाहेब महारनवर आणि संजय मासाळ आदी मान्यवर उपस्थित होते.पत्रकारांशी संवाद साधताना नवनियुक्त तालुका प्रमुख प्रवीण बोलभट म्हणाले की, “नगरपरिषद व जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये पक्ष कोणत्या पद्धतीने लढणार—महा-यूतीतून की स्वबळावर—याबाबत सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून अहवाल युवासेना प्रमुख श्रीकांत शिंदे आणि जिल्हाध्यक्ष बाबुशेठ टायरवाले यांना देण्यात येईल. वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे पुढील निर्णय घेतला जाईल.”











Comments