top of page
website.jpg

भाजपा नेते रवींद्र सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचं खर्डा जनसंपर्क कार्यालय: निष्ठा, संघर्ष आणि लोकसेवेसाठी नवस्फूर्तीचा टप्पा; आगामी जिल्हा परिषद निवडणूक लढवणार असल्याचा दृढ संकल्प

ree

खर्डा प्रतिनिधी/3 नोव्हेंबर2025


भाजपा नेते रवींद्र सुरवसे यांच्या भाजपा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज दि. ३ ऑक्टोबर २०२५ रोजी जामखेड तालुक्यातील खर्डा येथे संत सिताराम बाबा गडाच्या पायथ्याशी भव्य उत्सवासह पार पडले.

या सोहळ्यात खर्डा परिसरातील विविध भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि मान्यवरांची मोठ्या प्रमाणावर भागीदारी दिसून आली. उद्घाटनाच्या निमित्ताने तालुका कार्यकारिणीत नव्याने समाविष्ट झालेल्या पदाधिकाऱ्यांचा देखील सत्कार करण्यात आला.


कार्यक्रमात भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अजय काशीद, तालुकाध्यक्ष बापूराव ढवळे, प्रा. मधुकर आबा राळेभात, बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, उपसभापती नंदकुमार गोरे, संचालक विष्णू भोंडवे, भाजपा जामखेड मंडलाध्यक्ष संजय काशिद, माजी नगरसेवक अमित चिंतामणी, ग्रामपंचायत सदस्य गणेश शिंदे, महालिंग कोरे , मनिषाताई सूरवसे (पंचायत समिती उपसभापती), सरपंच दिपालीताई गर्जे तसेच खर्डा गटातील अनेक कार्यकर्ते आणि पत्रकार उपस्थित होते


रवींद्र सुरवसे मनोगत प्रस्ताविक भाषणात म्हणाले येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत खर्डा गटातून उमेदवारी जाहीर केली आणि कार्यकर्त्यांना एकजूट राहण्याचे आवाहन केले.२० वर्षांपासून सभापती प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षात सातत्याने व निष्ठेने काम केले, कधीही पक्षविरोधात गेलो नाही.२०१९ च्या पंचायत समिती सभापती निवडणुकीत, विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर त्रास दिला काही प्रसंग घडविला, पण तरीही भाजप व शिंदे साहेबांसाठी निष्ठा पाळली.


ग्रामपंचायत निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांना संधी देण्याचा मार्ग अवलंबला; माझ्या घरातील महिलेस सरपंच पदाच्या निवडणुकीत उमेदवारी दिली नाही, पण कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले. मागील निवडणुकीत पत्नीला सभापती पदावर एक वर्ष आणि उपसभापती म्हणून दीड वर्ष काम करण्याची संधी मिळाली. प्राधान्य निधीचे विविध विकासकामे पूर्ण केली.मध्यंतरी साधारण दीड महिना आजारी होऊनही नागरिकांचे आशीर्वाद आणि भक्तीने पुनः तयारीत आल्याची कबुली दिली.खर्डा परिसरातील भाजपच्या विजयानंतर पॅनलमधील सात सदस्य निवडून आले आणि सरपंच म्हणून भारतीय जनता पक्षाची नेमणूक झाली.आगामी काळात जनता व कार्यकर्त्यांनी पुरेपूर सहकार्य देऊन कार्यालयाचे कार्य फलदायी ठरेल अशी ग्वाही दिली.


सदर कार्यक्रम केवळ पक्षाचे कार्यालय सुरु होणं नव्हे, तर खर्डा व तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांना एकत्रित करून, आगामी जिल्हा परिषद निवडणुकांना बळ देण्याचा प्रगट उद्देश ठरला.


यावेळी उपस्थित मान्यवरांची शुभेच्छा, नागरिकांचा सहभाग आणि रवींद्र सुरवसे यांच्या जिद्दीमुळे हा उद्घाटन सोहळा खर्डा व परिसरातील राजकारणासाठी मार्गदर्शक ठरला आहे.यावेळी झालेल्या भाषणातून एकसंघ कार्यपद्धती, संघर्षमय प्रवास, आणि निष्ठावान नेतृत्वाचा आदर्श समाजासमोर आला आहे. आगामी निवडणुकांचा विचार करून कार्यकर्त्यांना प्रेरणा आणि एकजूट साधण्याची ग्वाही या उद्घाटन कार्यक्रमाने दिली.

यावेळी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महालिंग कोरे यांनी केले.

 
 
 

Comments


0 (D19).jpg

प्रत्येक क्षणाचं अपडेट

साप्ताहिक ‘पोलीस वारंट न्यूज नेटवर्क’च्या

नव्या वेबसाईटचे सोमवार दि १० नोव्हेंबरला लोकार्पण

आदरणीय. सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले
यावेळी सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांनी

संपादिका श्वेता गायकवाड यांना नवीन उपक्रमासाठी

मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.  
या कार्यक्रमास भाजपा पदाधिकारी,

कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,

वातावरण उत्साहाने दुमदुमले!

Website Designed, Developed and hosted by DIGITALFLY

Centent Provided by

POLICE WARRANT © 2025 All Rights Reserved

bottom of page

This text cannot be easily copied.

This text is also protected by the 'inert' attribute.