मोठी बातमी: जामखेडमध्ये नगरसेवकाच्या मानसिक छळामुळे नर्तकीने आत्महत्या करून संपवलं आयुष्य.. आरोपी अटकेत
- Police warrant
- Dec 5
- 2 min read

जामखेड – दि. ५ डिसेंबर २०२५
जामखेड येथील साई लॉजमध्ये ३४ वर्षीय महिला नर्तिकेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल, ४ डिसेंबर रोजी समोर आली आहे. मृतक दिपाली गोकुळ पाटील (वय ३४ वर्षे) याच्या कुटुंबियांनी भाजप माजी नगरसेवक संदिप सुरेश गायकवाड याच्या विरोधात विवाहासाठी सतत होणाऱ्या मानसिक छळाविरुद्ध तक्रार पोलिसांत नोंदवली आहे.
याबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत नर्तिका दिपालीच्या आई दुर्गा अरुण गायकवाड यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, दिपालीने गेल्या काही काळापासून तिच्या पतीपासून वेगळी राहण्याची स्थिती होती. दिपाली सुमारे दोन वर्षे जामखेड येथील ‘घुंगरू कला केंद्र’ येथे नृत्यकलेचे काम करत होती. तिने या ठिकाणी पार्टी मालकीन रेशमा आयुब पठाण यांच्या सोबत नृत्य करत मैत्रिणी हर्षदा कामटे व चांदणी रंजन रॉय यांच्यासोबत एकत्र राहत होती.
मृत नर्तिका दिपालीच्या आई दुर्गा अरुण गायकवाड यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, माजी नगरसेवक संदिप गायकवाड ने ‘माझ्याशी विवाह कर’ असे वारंवार आग्रह करत तिचा मानसिक छळ केला. दिपालीने विवाहाचा प्रस्ताव नाकारला असतानाही तो फोन करत होता , घरासमोर पाठलाग करत होता. दिपालीने या त्रासाबाबत अनेक वेळा आईला सांगितले होते.घटनेच्या दिवशी, दुपारी सुमारे १२:५० वाजता दिपाली संदिप गायकवाड याच्यासोबत साई लॉज, बटेवाडी, जामखेड येथे गेली. नंतर दुपारी तिने खोलीत प्रवेश केला नाही, ज्यामुळे तिच्या मैत्रिणी व चिंता व्यक्ती चांदणी रंजन रॉय व हर्षदा कामटे सायंकाळी सुमारे ५ वाजता साई लॉजवर पोहोचल्या. त्या रूम क्रमांक १०३ बाहेरून बंद असल्याचे पाहून त्यांनी लॉजमधील वेटरकडून चावी मागून दरवाजा उघडला तोव्हा दिपाली ओढणीच्या सहाय्याने पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली.
दोघी मैत्रिणींनी तिला गळफास सोडवून खाली उतरण्याचा प्रयत्न केला, परंतु ती बेशुद्ध होती. तत्पश्चात त्यांनी तात्काळ अॅम्बुलन्सला कॉल करून दिपालीला जामखेड ग्रामीण रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तिला दाखलपूर्व मृत घोषित केले.दिपालीच्या मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. डॉक्टरांच्या अहवालानुसार, ही घटना आत्महत्या असल्याचे स्पष्ट झाले.
अंत्यविधीसाठी मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला असून दिपालीला तिच्या मूळ गाव कल्याण येथे अंत्यसंस्कारासाठी नेण्यात येणार आहे.
फिर्यादीमध्ये माजी नगरसेवक संदिप गायकवाड याने विवाहासाठी केलेल्या सततच्या दबावामुळे दिपालीला मानसिक छळ सहन करावा लागल्याने आत्महत्येस प्रवृत्त केले कलम 108 भादवी प्रमाणे जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 648 / 2025 BNS108 प्रमाणे दाखल करण्यात आले असून तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर गावडे करत आहेत. आरोपी माजी नगरसेवक संदीप गायकवाड यास जामखेड पोलीसांनी अटक केली आहे.











Comments