मोठी बातमी! नगरपरिषद-नगरपंचायत निकाल ३ डिसेंबर ऐवजी २१ डिसेंबरला जाहीर होणार
- Police warrant
- Dec 2
- 1 min read

मुंबई प्रतिनिधी /२डिसेंबर२०२५
महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी ३ डिसेंबरला होणार होती, परंतु मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सर्व निवडणुकीचे निकाल एकाच दिवशी, म्हणजेच २१ डिसेंबर रोजी जाहीर करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे मतदान आज (२ डिसेंबर) झाला, तरी मतमोजणी २१ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.उच्च न्यायालयाने हा निर्णय निवडणूक प्रक्रिया पारदर्शक राखण्यासाठी आणि निकाल विलंब केल्याने पुढच्या निवडणुकीवर होणाऱ्या परिणामांना आळा घालण्यासाठी दिला आहे. काही नगरपरिषदांबाबत न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असल्यामुळे आधी मतदान पुढे ढकलण्यात आले होते. या आदेशानुसार २० डिसेंबरपर्यंत आचारसंहिता लागू राहील आणि कोणत्याही एक्झिट पोल्सवर बंदी राहणार आहे.या निर्णयामुळे राज्यातील सर्व नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीचे निकाल एकाच दिवशी जाहीर होऊन निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुव्यवस्थित होणार आहे.











Comments