रत्नागिरी रेल्वे मार्गावर चोरांचा खात्मा! जामखेमधील मास्टरमाइंड आरोपी शिताफीने पोलिसांच्या जाळ्यात, ४२ ग्रॅम सोने जप्त
- Police warrant
- 6 days ago
- 1 min read

जामखेड (प्रतिनिधी): 15 डिसेंबर 2025
मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या नेरूळ यूनिट 5 ने रत्नागिरी रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या रेल्वे चोरीच्या साखळीला मोठा धक्का दिला आहे. जामखेड येथील मुख्य आरोपी विनोद सखाराम जाधव (वय ३२) याला शिताफीने पकडून त्याच्याकडून ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने (मूल्य ५ लाख २ हजार रुपये) आणि इतर मालमत्ता हस्तगत केली आहे. या कारवाईत एकूण ८ रेल्वे चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
नुकतेच स्थापन झालेल्या रत्नागिरी रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापे वामने ते दिवाण खवटी रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वे मेल गाड्यांमधून सोन्याचे दागिने आणि पर्स चोरीचे प्रमाण गतावयकांत वाढले होते. प्रवाशांच्या तक्रारींनी पोलीसांना सतर्क केले. पो.उपनिरीक्षक लोणकर आणि त्यांच्या स्टाफला या चोरींची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक विजय खेडकर यांनी तात्काळ तीन विशेष पथके रवाना केली.
खबरदारी घेत विशेष पथकाने आहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथून मुख्य आरोपी विनोद सखाराम जाधवला शिताफीने पकडले. तपासादरम्यान त्याचे साथीदार मारूती राजेंद्र झरे, सोनू सुरेश काळे आणि लाला मच्छिंद्र पवार यांचा सहभाग उघड झाला. आरोपींच्या कबुलीप्रमाणे, त्यांनी एकूण ८ चोरीचे गुन्हे केले होते.
आरोपींची चोरीची पद्धत अत्यंत खोडयुक्त होती. ते सीसीटीव्ही कॅमेर्यांचा धोका टाळण्यासाठी मारूती डिझायर गाडीने रेल्वे स्टेशनपर्यंत येत. गाडी दूर उभी करून झाडांमध्ये लपायचे. सोनू काळे हा रेल्वे अॅपवरून मेल गाड्यांची माहिती घेत अंधारात उघड्या खिडक्यांतून हात घालून सोन्याचे दागिने आणि पर्स चोरायचा. विनोद जाधव पोलिस कस्टडीत असताना संपूर्ण गुन्हा कबूल केला आहे.या कारवाईमुळे रत्नागिरी रेल्वे मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. आरोपींना कोर्टात हजर करून पोलिस कस्टडी मागण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. नेरूळ यूनिट ५ च्या या कामगिरीचे वरिष्ठांकडून कौतुक करण्यात आले आहे.











Comments