लोकनेते गोपीनाथ मुंडें यांच्या आठवणींना उजाळा: सभापती प्रा.राम शिंदेंच्या संपर्क कार्यालयात जयंती साजरी
- Police warrant
- Dec 12
- 1 min read

जामखेड, १२ डिसेंबर:२०२५
शहर आणि तालुक्यातील विविध गावांमध्ये माजी केंद्रीय मंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी झाली. विशेषतः विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या संपर्क कार्यालयात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मुंडे साहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळी बोलताना नेत्यांनी मुंडे यांच्या कार्याचा, संघर्षाचा आणि जनतेच्या हक्कांसाठी झालेल्या लढ्याचा उल्लेख करून आठवणींना उजाळा दिला.
यावेळी जेष्ठ नेते मधुकर राळेभात,माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय वारे,बाजार समिती सभापती शरद कार्ले,जेष्ठ नेते अंकुश ढवळे,शहर , युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बाजीराव गोपाळघरे, मंडळाध्यक्ष संजय काशीद,बाजार समिती उपसभापती नंदकुमार गोरे,माजी नगरसेवक डॉ. ज्ञानेश्वर झेंडे, अमित जाधव,डॉ. विठ्ठल राळेभात, पोपट राळेभात, गोरख घनवट, ज्ञानेश्वर अंदूरे, पिंटू बोरा, संजय बेरड भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. या कार्यक्रमाने मुंडे साहेबांचे विचार पुन्हा एकदा जागे झाले.











Comments