विजेच्या तणावावर मात; खर्डा नवी पेठ कातोरे डीपीमध्ये 200 केव्ही ट्रान्सफार्मर बसवण्याचा निर्णय – रवींद्र सुरवसे यांचा अग्रगण्य वाटा
- Police warrant
- Nov 4
- 1 min read

खर्डा प्रतिनिधी/४ नोव्हेंबर२०२५
जामखेड तालुक्यातील खर्डा नवी पेठ येथील कातोरे डीपीवरील वीज ग्राहकांची संख्या जास्त असल्यामुळे व त्यावर ओव्हरलोड असल्याने, ट्रान्सफार्मर वारंवार बंद होत होता. या तक्रारीची दखल घेऊन भाजपाचे नेते रवींद्र सुरवसे यांनी महावितरणशी संपर्क करून ट्रान्सफार्मर 200 केव्ही करण्यात येणार असल्याचे अधिकृत केले आहे, ज्यामुळे वीज पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे .
वीज ट्रान्सफार्मर क्षमता वाढवण्याचा निर्णय:
रवींद्र सुरवसे यांनी खर्डा परिसरातील विविध DP ची क्षमता लवकरच वाढवण्याचा आदेश दिला असून, मोठ्या निधीने ही कामे राबवली जातील. अखेर, उध्या नवीन ट्रान्सफार्मर बसवण्याची प्रक्रिया सुरू होईल, ज्यामुळे नागरिकांच्या व औद्योगिक ग्राहकांच्या वीज गरजा पूर्ण होतील .
खर्डा आणि परिसरातील लहान लहान DP लवकरच क्षमता वाढवली जाणार आहे. त्याचबरोबर, जुन्या तारांची जागा नवीन तारा आणि पोलने बदलली जाणार आहे. सभापती राम शिंदे यांच्या मदतीने, मोठ्या निधीतून मेंटेनन्ससाठी आवश्यक खर्च केला जाईल , खर्ड्यासाठी मोठ्या ट्रान्सफार्मरची स्थापना होत आहे. या अधिक क्षमतेच्या ट्रान्सफार्मरमुळे, ओव्हरलोड आणि अतिप्रवाहामुळे होणाऱ्या वीज बंदींवर नियंत्रण येण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे वीजसंकट कायमस्वरूपी कमी होईल, असे भाजपाचे नेते रवींद्र सुरवसे यांनी पोलीस वारंट न्यूज नेट्ववर्कशी संवाद साधताना सांगितले आहेत
कोट
सत्तेच्या माध्यमातून मा. सभापती रवी दादा सुरवसे यांचा सातत्याने विकास कामांचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न सतत चालू आहे. त्यांच्या प्रत्येक आजच्या कामातून या प्रामाणिक व निरंतर प्रयत्नांचा ठसका दिसून येतो. वीज पुरवठा सुधारणा, ट्रान्सफार्मर क्षमता वाढवणे, सर्व दृष्टीने विद्यालये, रस्ते, पाणीपुरवठा यांसह गाव-शहराचा विकास या सर्व सुविधांमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात प्रगती होत आहे.
त्यांच्या नेतृत्वाखाली गावाचा समग्र विकास होण्याचा मार्ग साकारणारा आहे. त्यामुळे, सतत प्रगती करत, नव्या नव्या निर्णय घेऊन ते विकासाच्या डोंगराला उंचावत आहेत.हा प्रयत्न गावकऱ्यांच्या हितासाठी व विजेच्या समस्यांसह इतर मूलभूत सुविधा सुलभता करण्यात झपाट्याने काम करणारा आहे, ज्यामुळे खर्डा आणि परिसराचा उज्ज्वल भविष्यातील विकास निश्चित होईल.











Comments