"स्विफ्ट गाडीने धडक देऊन केली हत्या, आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात"
- Police warrant
- Nov 1
- 1 min read

आहिल्यानगर प्रतिनिधी/१नोव्हेंबर२०२५
दिनांक 28/10/2025 रोजी कर्जत तालुक्यात राशीन गावातील कोर्टी परिसरात तेजस संजय काळे आणि मयत चंद्रशेख रामदास जाधव यांच्यात पैशाच्या व्यवहारातून वाद झाला होता. मयत चंद्रशेख जाधव आणि त्यांचा मित्र पृथ्वीराज साळुंके स्विफ्ट कारने जात होते तेव्हा आरोपी तेजस काळे यांनी त्यांची कार पाठलाग करून जोराची धडक दिली. या धडकेत मयत चंद्रशेख जाधव यांच्या मृत्यू झाला आणि पृथ्वीराज साळुंके जखमी झाले होते.
यावरून कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी तेजस काळेला पकडण्यासाठी पथक तयार करून 30/10/2025 रोजी बनपिंप्री गावाजवळ सापळा लावून त्यांना अटक केली.
आरोपीकडे एक पांढर्या रंगाचा स्विफ्ट कार आणि मोबाईल्सही जप्त केले गेले.या केसवर अनुसरून, स्थानिक राजकीय आणि सामाजिक नेत्यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही सामाजिक संघटना आणि पक्षांनी या खुनाची चौकशी सीआयडीद्वारे करण्याची मागणी केली आहे. यामध्ये दलित अत्याचारांच्या संदर्भात घटनांच्या वाढीबाबत चिंताही व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकरणाचा प्रत्येक बाजूने मृतकांच्या पालकांना न्याय मिळावा आणि घटनांमध्ये सामील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे
.तपासातील पुढील काम कर्जत पोलीस स्टेशनवर सुरु असून, आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांतर्गत कारवाई करण्यात येत आहे.
सदर कारववाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार रमेश गांगर्डे, फुरकान शेख, भाऊसाहेब काळे, अमोल पोपट, बाळासाहेब खेडकर, मनोज साखरे, चालक अरुण मोरे यांनी केली.
सामाजिकदृष्ट्या देखील हा प्रकार मोठा राजकीय आणि सामाजिक प्रश्न म्हणून उठत असून, या घटनेने परिसरात सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण केला आहे. परिणामस्वरुप या प्रकरणाची त्वरित आणि सत्यनिष्ठ चौकशी करण्याचे लक्ष आहे ज्यामुळे पुढील कायदा सुव्यवस्था ठाम राहील.











Comments